भूषण चोभे
निफाड प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील व्हिजन अकाडमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सन २०२०-२१ या परीक्षेत भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात कु.नंदिनी संदिप जेऊघाले व कु.श्रेया विलास कर्डिले या शिष्यवृत्तीस पात्र झाल्या.
या विद्यार्थीनींना प्रतिवर्ष १२०००/- रु शिष्यवृत्ती इयत्ता १२वी पर्यंत (एकूण ४८०००/- रू) महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळणार आहे. मागील वर्षी झालेल्या परीक्षेत देखील व्हिजन अकॅडमीचे एकूण तीन विद्यार्थी पात्र झाले होते. व्हिजन अकॅडमीचे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन अकॅडमी व सर्व शिक्षक सदैव प्रयत्नशील असतात. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन संचालक गौरव कर्डिले व परवेझ अत्तार तसेच शिक्षक तेजल धारराव,वहीदा तडवी, वैष्णवी गवते, वेदिका व्यवहारे, ज्ञानेश्वर नवले व विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पालकांनी शिक्षकांनचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम