द पॉईंट नाऊ ब्युरो : सध्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन व्यवहारांचा अधिक वापर होऊ लागला आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा अनेक प्रकारच्या ऍपचा ऑनलाईन व्यवहारासाठी वापर केला जातो.
मात्र सावध व्हा. खास करून, दुकानदार मंडळींनी. आता असे काही ऍप आलेत, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत, असे स्पष्ट तुमच्या नावासह दाखवले जाते. मात्र अकाउंटला पैसे येत नाही. वास्तविक पाहता त्या व्यक्तीने पैसे सेंड केलेलेच नसतात. कारण सदर व्यक्ती ही काही खोट्या पैसे पे करण्याच्या ऍपचा वापर करून, तुम्हाला गंडा घालते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैसे पेड करण्यासाठी तुमचा QR कोड स्कॅन तर केला जातो. मात्र त्यात येणाऱ्या नावाचा वापर करुन पैसे पे करण्याच्या खोट्या ऍपवर हुबेहूब आय. डी. दाखवला जातो. आणि पैसे पेड झालेत, असं स्क्रीन वर तुम्हाला दाखवलं जातं.
मात्र दुकानदारांनो आणि इतरही असे अनेक जण जे हे व्यवहार दैनंदिन करतात, अशांनी ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. अशा खोट्या ऍपचा वापर करून सर्रासपणे तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला समोरच्याने पैसे सेंड झाल्याचा स्क्रीन जरी दाखवला, तरी आधी तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत, याची खात्री करुन घ्या. अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो.
सोशल मीडियावर याचं थेट प्रात्यक्षिकच एकाने करून दाखवलं आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेला व्हिडीओ नक्की पहा. ज्यातून तुम्हांला कसा गंडा घातला जातो, हे स्पष्ट दिसेल.
असे बरेचसे ऍप सध्या दिसून येत आहेत. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींपासून सावध रहा. तुम्ही देखील सतर्क रहा आणि अशा व्यवहारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी दक्ष रहा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम