प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या पिंपळगाव येथिल शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच वादात प्रसिद्ध आहे. या बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण तर कधी शिवीगाळ होत असत.पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कामकाज किती शेतकरी हिताचे व व्यापाऱ्यांचे हे आज पर्यंत दिसून आले आहे.
या बाजार समितीच्या आवारातील मस्तावलेले व्यापारी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट करतात त्या संदर्भाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पिंपळगाव बसवणंत बाजार समिती मध्ये चक्क वजन काट्याच्या खाली दगड बांधून शेतकऱ्यांची व्यापारी दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची न घालता लुट करत होता आणि याचा पर्दाफाश टोमॅटो उत्पादक शेतकरी योगेश वक्ते रा. शिवरे, ता. चांदवड या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केला.योगेश तक्ते यांनी टोमॅटो बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याआगोदर त्यांनी शेतातच वाजनकाट्याने वजन करून २० किलो वजनाचे टोमॅटो क्रेट भरले.
एकूण ४३ क्रेट मध्ये ८५० किलो टोमॅटो घेऊन शेतकरी योगेश तक्ते पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आले असता बाजार समितीतील व्यापारी एम.एस.वर्मा यांनी टोमॅटो खरेदी केले टोमॅटो क्रेट व्यापाऱ्याच्या काट्यावर टाकले असता काट्यात माप करत असल्याचे आढळून आले असून यावर बाजार समिती प्रशासन नेमके काय कारवाई करण्याची भूमिका घेते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
आज पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वर्मा नामक व्यापाऱ्यांस टोमॅटो विक्री केला आहे त्या शेतकऱ्यांना हि या व्यापाऱ्याकडून फसविले गेले असेल असे दिसून येत आहे.सदर पिंपळगाव बाजार समिती टोमॅटो मार्केटसाठी नाशिक जिल्ह्यात च प्रसिद्ध नसून इतर जिल्ह्यात हि प्रसिद्ध असल्याने इतर जिल्ह्यातून हि टोमॅटो विक्री करता या बाजार समितीत शेतकरी घेऊन येतात.
जर या बाजार समितीत असेच प्रकार घडत राहिले शेतकरी आधीच बाजार भाव मिळत नसल्याने व कर्जबाजारी झाल्याने मेटाकुटीला आहे त्यातच हे व्यापारी हि मापात पाप करून शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खात आहे असे होत राहिले शेतकरी उध्वस्त होऊन जाईल याची सर्वस्वी जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती ची राहील.तर मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे नावारूपास असलेली बाजार समिती या लूटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यामुळे बाजार समितीचे नाव खराब होईल.
नाशिक जिल्ह्यात टॉमेटो चा हंगाम सुरू होताच आठवडे भरातच दर कोसळले कवडी मोल दर दर्जेदार टोमॅटो ला भाव मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता परंतु थोडे फार दर वाढल्याने कुठे तरी शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील अशी आशा वाढणार तोच व्यापारी काटा मारत असेल तर भाव वाढ होऊन हि शेतकरी उपेक्षित च राहणार असे यातून दिसून येते.
गाडी भाडे द्यावे की शेतमजुरांची मजुरी ,इंधन दरवाडीने देखील शेतमाल दळणवळण करणे मुश्किल झाले आहे आणि त्यात कवडीमोल दरामुळे दर्जेदार टॉमेटो अनेक वेळा रस्त्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली होती मात्र अनंत चतुर्थी झाल्यावर टोमॅटो दरात सुधारणा झाली.कुठे तरी टोमॅटो ला बऱ्यापैकी भाव मिळू लागले होते मात्र व्यापारी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट करू लागले ते देखील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चव्हाट्यावर आले.
पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून वजन काट्याला दगड बांधण्याचे षड्यंत्र शेतकऱ्यांनी हाणून पाडले आहे.आता बाजार समिती प्रशासनाने संबधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो काट्यात मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या लुटीच्या प्रकारची कसून चौकशी करून व्यापारी दोषी आढळल्यास व्यापाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. टोमॅटो चा सौदा झालेल्या बाजर भावा प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापारी व आडतदार यांनी द्यावे अशी ताकीद दिली आहे या बाजार समितीत शेतकरी हिताच्या आड येणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. बाजर समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी व हितासाठी खंबीरपणे कायम उभी राहील.
आमदार दिलीपराव बनकर,
सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत
मी स्वतः वीस किलो वजन असलेले टोमॅटो भरलेले क्रेट चे वजन माझ्या शेतातच केले होते. बाजार समितीत सौदा झाल्यानंतर व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर वजन केले असता मात्र ते कमी भरले,मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून वजन काट्याची तपासणी केली असता काट्याच्या खाली पारड्याला दगड बांधून ठेवलेला दिसून आला.या चोरीचा पर्दाफाश होताच संतप्त शेतकऱ्यांनी वर्मा नामक व्यापाऱ्याला जाब विचारला असता व्यापाऱ्याची भांबेरी उडाली. सदर शेतकऱ्यांची होणारी लूट त्वरित कारवाई करून बाजार समितीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
योगेश वक्ते टोमॅटो उत्पादक शेतकरी शिवरे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम