द पॉईंट नाऊ विशेष : देवळा नगरपंचायत रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 16 हा देखील महत्वाचा आहे. या प्रभागात भाजपा तर्फे इच्छुकांची गर्दी आहे, तर महाविकास आघाडी तर्फे देखील दोन उमेदवार इच्छुक आहेत.
या प्रभागात गेल्या निवडणुकीत संतोष उर्फ गोटु शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. हा पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे शिंदे पुन्हा ताकदीनिशी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर विद्यमान नगरसेविका पती दीपक आहेर हे देखील विकासाच्या मुद्द्यावर लढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी नगरसेविका वृषाली आहेर यांनी त्यांच्या कार्यकाळात हांडवा मळा शिवार पांदीरस्ता डांबरीकरण, कोळी वस्ती सिंगल फेज ,श्री रामराम हौसिंग सोसायटीत भुमिगत गटार, वाजगांव नाका गार्डन, पथदीप आदी विकास कामे केले आहेत. ह्या कामावर जनता समाधानी असल्यास पुन्हा दीपक आहेर यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास त्यांना विकास कामांचा फायदा होतो का हे बघणं महत्त्वाचे आहे.
भाजप कडून इच्छुक उमेदवारांमध्ये माजी आरोग्य मंत्री स्व डी एस आहेर (बाबा )यांचे खंदे समर्थक तसेच जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांचे निकटवर्तीय पुंडलिक आहेर, दीपक आहेर, अपक्ष अनिल आहेर तर महाविकास आघाडीकडून संतोष उर्फ गोटु शिंदे, अशोक विश्वनाथ आहेर, हे इच्छुक आहेत. महाविकास आघाडी कडून प्रत्येक वॉर्डात इच्छुकांची संख्या कमी असल्याने बंडखोरीची शक्यता कमी आहे .
भाजपा कडून मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीला वाव आहे, समजा पक्ष नेतृत्वाने बंडखोरांना थोपवले तरी ते पक्षाच्या उमेदवाराचे काम करतील का ? ही देखील शंका आहे . यामुळे येणाऱ्या काळात या प्रभागातील चित्र लवकरच स्पष्ट होणार असून, या वॉर्डात दुरंगी लढत अटळ आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवसा अखेर पर्यंत एकही अर्ज प्राप्त झाला नाही . मात्र, पुढील रणनीती ठरविण्यासाठी पक्षीय पातळीवर गुप्त बैठकांना जोर आला असून ,राजकिय घडामोडींना वेग आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम