द पॉईंट नाऊ विशेष : देवळा नगरपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 हा अनुसूचित जमाती साठी आरक्षित वॉर्ड असल्याने याठिकाणी देखील मोठी चुरस असणार आहे. या वॉर्डात दुरंगी लढत शक्य आहे, यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होऊ शकते. यात भाजपा तर्फे भूषण गांगुर्डे, व रघु नवरे इच्छुक आहेत तर धनंजय राजवाडे यांचे नाव मात्र दोघ बाजूंनी चर्चेत आहे.
भाजपा तर्फे भूषण बाळू गांगुर्डे यांना थेट जनतेतून उमेदवारी साठी आग्रह होत असल्याने , इतर इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. उमेदवारी साठी सर्वसाधारण कुटुंबातील युवा उमेदवार असल्याने अनेकांनी याचा धसका घेतला आहे. वॉर्डातील नागरिक सर्व निवडणूक खर्चासाठी डिपॉझिट देखील जमा करणार असल्याने भाजपा तर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
तर राष्ट्रवादी तर्फे धनंजय राजवाडे, केदा गांगुर्डे , केदा माळी हे नाव इच्छुकांच्या यादीत आहेत. देवळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित वॉर्डात देखील उमेदवारीसाठी चुरस आहे. रघु नवरे व धनंजय राजवाडे हे दोघेही माजी सदस्य आहेत, दोघांना कामाचा अनुभव असल्याने या ठिकाणी दोघांमध्ये सामना झाल्यास तुल्यबळ अशी लढत होईल.
रघु नवरे हे जितेंद्र आहेर यांचे निष्ठावंत समर्थक आहेत. त्यांनी एकत्रित भाजपच्या तंबूत प्रवेश केला होता, या कारणांनी त्यांना भाजपाचे तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर राजवाडे देखील भाजपा पक्ष नेतृत्वाला भेटले आहेत, तसेच ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची देखील माहिती आहे. समजा भाजपाचे तिकीट नवरे यांना सोडल्यास राजवाडे हाती घड्याळ बांधून मैदानात उतरतील. व या वॉर्डात दोघेही उमेदवार अनुभवी व शैक्षणिक दृष्टीने सक्षम असे असल्याने कोना एका बाजूने मतदार झुकतील असे नाही.
या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव चांगला असला तरी जितू अण्णांना मानणारा वर्ग देखील जास्त आहे. या भागातील मतदार सुज्ञ व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असल्याने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम