वृक्षारोपणाच्या माध्यमातून स्मृती जतन ; आहेर कुटुंबियांचा आदर्शवादी पायंडा

0
49
फोटो ओळ ; देवळा - खडकतळे येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करतांना दिनकर आहेर, संजय आहेर, प्रकाश आहेर, अशोक आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जलप्रदूषण टाळण्यासाठी रक्षाविधी शेत शिवारात करण्याची आदर्श परंपरा सुरू झाली आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील खडकतळे येथील आहेर कुटुंबीयांनी वडिलांची रक्षाविधीची राख शेतात टाकून तेथे स्मृती वृक्षारोपण केले .

खडकतळे येथील व देवळा बाजार समितीचे लेखापाल दिनकर आहेर , प्राथमिक शिक्षक संजय आहेर ,प्रकाश आहेर , अशोक आहेर यांचे वडील कै महादू चिंधा आहेर यांचे (दि १३) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी (दि १५) रोजी रक्षा विधीचा कार्यक्रम होता. अस्थींसह जमा केलेली राख त्यांच्या शेतात टाकत त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. पाच स्मृती वृक्ष लावण्यात आले. प्रत्येक गावांत असा उपक्रम राबवला जावा. आपल्या प्रियजनांच्या आठवणी वृक्षाच्या रुपात जिवंत ठेवाव्यात ,अशी अपेक्षा देवळा बाजार समितीचे लेखापाल दिनकर आहेर, प्राथमिक शिक्षक संजय आहेर ,कडू आहेर,माणिक आहेर,अनिल आहेर ,यश आहेर यांनी व्यक्त केली.

 

फोटो ओळ ; देवळा – खडकतळे येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करतांना दिनकर आहेर, संजय आहेर, प्रकाश आहेर, अशोक आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here