द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भिलवाड ता.देवळा येथे विजेच्या तीव्र झटक्याने आज मंगळवार (दि .७) रोजी राजेंद्र देवराम पिंपळसे (वय ५०) या मजुराचा मृत्यू झाला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर मजूर हा कांदे भरण्याच्या कामासाठी गेलेला असतांना शेतातील विद्युततारेस स्पर्श झाल्याने तीव्र झटक्यात या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. यामूळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून ,अधिक तपास देवळा पोलीस करत आहेत.
Edit bye
– Somnath Jagtap
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम