विनयभंग झाल्याच्या धक्क्याने तरुणीची आत्महत्या

0
38

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : एका नराधम युवकाने भुसावळ तालुक्यातील एका गावात अल्‍पवयीन तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने त्या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसल्याने, या अल्पवयीन तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपवले असून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

भुसावळ (Bhusawal) तालुक्‍याती युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याने १ फेब्रुवारीला दुपारच्‍या सुमारास गैरवर्तन करण्याच्‍या उद्देशाने घरात प्रवेश करून त्‍याने पिडीतेला आमीष दाखवत तिचा विनयभंग केला. त्या गोष्टीचा अल्पवयीन पिडीत मुलीने मनस्ताप करून घेत राहत्या घरात छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली.

या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस (Police) स्थानकात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here