
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात अभिनव पद्धतीने एकमेव अशी विधवा आधार योजना राबवून सुराणा पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला असून पतसंस्थेचे काम प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार पंचायत राज समितीच्या सदस्यांनी काढले.

शनिवार दि. २७ रोजी देवळा भेटीवर आलेल्या पंचायत राज समितीचे सदस्य आ. अंबादास दानवे, आ. प्रशांत बंब, आ. रत्नाकर गुट्टे, आ. डॉ. राहुल पाटील यांनी जिल्ह्यातील अग्रगण्य अशा श्रीमान सुगणमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी योजनांची माहिती घेतली. तसेच पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. या भेटी प्रसंगी अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांनी सर्वांचे स्वागत केले. तर संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. जगदीश धामणे, संचालक रमेश संकलेचा, प्रदिप सुराणा, हरकचंद ओस्तवाल, ईश्वर सुराणा, धरमचंद संचेती, सुभाष सोनवणे, राजेंद्र सुराणा, डॉ भुषण कर्नावट, जर्नादन शिवदे, संजय कानडे, संचालिका सुशिला सुर्यवंशी, सुरेखा सुराणा, व्यवस्थापक महेश जोशी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम