देवळा प्रतिनिधी : खर्डे ता देवळा येथे घरांवर लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारा भूमिगत करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला .वाखारी जिल्हा परिषद गटातील सदस्या नूतन आहेर यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि ११ ) रोजी भूमिपूजन करण्यात आले . या कामाचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
विद्युत तारा भूमिगत होणारे खर्डे गाव तालुक्यातील एकमेव गाव असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण गाव विद्युत तारांनी भूमिगत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या डॉ.सौ.नूतन आहेर यांनी यावेळी दिली . नागरिकांनी मागणी केलेल्या कामाच्या पाठपुराव्याला यश आले आले असून,आज प्रत्येक्षात कामाला सुरुवात देखील करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर , माजी सरपंच नारायण जाधव, उपसरपंच राहुल देवरे, काकाजी देवरे ,ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जगताप , प्रहारचे भाऊसाहेब मोरे, निंबा निकम, , संदीप पवार, प्रवीण देवरे, सुभाष मोरे, राजाराम गांगुर्डे , मुन्ना जाधव, संदीप देवरे , ग्रा.पं.प्रशासक प्रशांत पवार, अभियंता आर.बी.चव्हाण, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम