द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी (दि १) रोजी देवळा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा आशय असा की , राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत .
याकामी मंत्री महोदय आणि शासनाच्या वरिष्ठ सनदी अधिकान्याकडे आजपर्यंत शेकडो निवेदने सादर करून आणि भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही कोणत्याच मागण्याची सोडवणूक झालेली नाही . मागील दीड वर्षाच्या कालावधीत कोरोनाचे कारण सांगून महत्त्वाच्या मागण्यांच्या सोडवणुकीकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे . प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्याकडे शासनाची उदासीनता दिसून येत असल्याची राज्य शिक्षक समितीची धारणा झालेली आहे . या मागण्यांचे लक्ष वेधण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हयात सोमवारी( दि . १) रोजी निवेदन देण्यात आले .
यात प्रामुख्याने सर्व शिक्षा अभियान अंतर्गत भेदभाव न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळावा , मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनींना दैनिक उपस्थिती भत्ता १ रुपयाऐवजी २५ रुपये करावा , प्राथमिक शिक्षक सेवकाचे मानधन रु . ६ हजार रुपये वरून रु . २५ हजार रुपये करावे , १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी , वरिष्ठ वेतन श्रेणी ७ व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्या , शिक्षकांच्या DCPS कपात रकमेच्या हिशोबातील घोळ दूर करावा , पुर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकाची ( वस्तीशाळा स्वयंसेवक ) प्रथम नियुक्ती तारीख सर्वप्रकारच्या लाभासाठी ( ज्येष्ठता , वरिष्ठ वेतन श्रेणी , निवृत्ती वेतन इत्यादी ) मान्य करावी ,शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही अविलंब सुरु व्हावी .
त्यासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात . यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना विनाअट कार्यमुक्त करावे , ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतचे दि . ९ सप्टेंबर २०१ ९ चे परिपत्रक रद्द करावे, जून २०१४ ची अधिसूचना रद्द करून राज्यातील केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा प्राथमिक शिक्षकांतून पदोन्नतीने भराव्यात ,शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक वेतन १२१६ / प्र.क्र . १२३ / ६ / टीएनटी -3 , दि . १३ ऑक्टोबर २०१६ रद्द करून सर्वच पदवीधर विषय शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी मिळावी , दरमहा वेतनास होणारा विलंब दुर करुन वेतन १ तारखेला मिळावे , शिक्षक बदली धोरणाबाबत चर्चा करून व्यापक सुधारणा करणे , MS – CIT उत्तीर्ण करण्यासाठीची मुदतवाढ व रोखलेल्या वेतनवाढी मोकळ्या करणे , BLO सारखी अशैक्षणिक कामे काढून घेणे आदी मागण्यांचा समावेश आहे . यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप आहेर, संदीप पगार,रमेश आहेर,विजय आहेर,अशोक बच्छाव,सतीश आहेर,राजेंद्र देवरे,भरत सावन्त, जिभाऊ सूर्यवंशी, दिनेश आहेर,उखा सावकार ,बागुल आदी शिक्षक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम