विद्यार्थी झाले कोरोना बाधित ; शाळेची घंटा पुन्हा बंद…!

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद क्षणीक ठरला आहे, कारण मुंढेगावातील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाचे 15 विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून. या विद्यार्थ्यांना नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच कळवण तालुक्यातील एका विद्यार्थ्याला प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी केल्यानंतर 15 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट केले आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विलगिकरण करण्यात आले असून, आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी भेट घेऊन वैद्यकीय पथकाला सूचना केल्या आहेत.

वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे, यामुळे संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे.

सर्व कर्मचारी मेहनत घेत असून आरोग्य सहाय्यक तानाजी अहिरराव, वैज्ञानिक अधिकारी डॉ. कावेरी ढिकले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री घरटे, आशा कार्यकर्त्या यांच्या पथकाने रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here