द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : विद्यार्थी वर्गासाठी एक बातमी आहे. आता येणाऱ्या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा या आता ऑफलाईन होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होत होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मे 2022 मध्ये या परीक्षा ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. पदवी स्तरावर 60 गुणांची परिक्षा 90 मिनिटांची असेल, तर पदव्युत्तर स्तरावर 60 गुणांची परीक्षा 120 मिनिटांची असेल. तर बहिस्थ अभ्यासक्रम पदवी-पदव्युत्तर साठी 100 गुणांची परीक्षा 50 प्रश्नांसह 120 मिनिटांची असणार आहे.
आत्तापर्यंत परीक्षा या ऑनलाइन होत होत्या. मात्र आता या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांना विशेष तयारी करावी लागणार आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाऊन, त्यांच्या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम