
देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील खामखेडा , विठेवाडी ,सांगवी व श्री रामराव आहेर आदिवासी विकास येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी ( २९) रोजी अखेरच्या दिवशी येथील सहायक निंबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सभासदांची गर्दी दिसून आली.

विकास सोसायटी निहाय प्राप्त अर्ज कंसात पुढीलप्रमाणे , खामखेडा (३३ ), विठेवाडी ( ५४ ) , सांगवी( ४२ ) , श्री रामराव आहेर आदिवासी विकास (१३ ) याप्रमाणे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत . या सर्व अर्जांची बुधवार ( दि ३० ) रोजी छानणी करण्यात येणार आहे . अशी माहिती सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली. दरम्यान ,तालुक्यातील दहिवड,मेशी,खर्डे,पिंपळगाव वाखारी ,खडकतळे, डॉ जे डी पवार ,भऊर,सरस्वतीवाडी व ,काळू आनंदा पवार,भऊर या संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या बुधवार (३० ) रोजी माघारीची अंतिम मुदत असून, यानंतर या गावातील निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे . तालुक्यातील बहुतांश विकास सहकारी संस्थांची मुदत संपली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राधिकरणाला निवडणुका घेता आल्या नाही . आता कोरना संपुष्ठात येत असल्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या प्राधिकरणाने निवडणुका जाहीर केल्या आहेत . देवळा तालुक्यात एकूण ४२ विकास संस्था असून ,यातील बहुतांश संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे . यामुळे येन उन्हाळ्यात राजकीय वातावरण तप्त झाले आहे . विकास संस्थाच्या संचालकांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार तसेच उमेदवारी करता येत असल्याने तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुका संचालक पदाच्या मतदानासाठी संस्थेच्या एका संचालकाचा ठराव पाठविण्यात येत असल्याने या संस्थांच्या निवडणुकीला विशेष महत्व आले आहे .
यामुळे बहुतांश गावात निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे . काही संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यात जमा असून , काही ठिकाणी चुरस निर्माण होण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे .यामुळे गावागावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे . याचे खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम