विठेवाडीच्या युवा वर्गाच्या सक्रिय सहभागातून जेसीबीच्या साह्याने रस्त्यातील झुडपांचे अडथळे दूर

0
10

द पॉईंट नाऊ विठेवाडी तादेवळा येथील युवा वर्गाच्या सक्रिय सहभागातून जेसीबीच्या साह्याने झुडपांचे अडथळे दूर करताना मुरून टाकताना युवक छाया सोमनाथ जगताप

देवळा प्रतिनिधी : ‘सरकारी काम अन बारा महिने थांब’ अशी म्हण आपण ऐकत असतो परंतु विठेवाडी-देवळा रस्त्यावरून प्रवास करताना त्याचा असाच अनुभव आल्याने विठेवाडी गावातील तरुणांनी एकत्र येत हे काम तडीस नेले. त्यासाठी त्यांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागले पण रस्त्यावरचा प्रवास सुकर झाल्याचे समाधान त्यांना मिळाले.

तालुक्यातील विठेवाडी ते देवळा या जिल्हा परीषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला काटेरी झाडे व झुडपे यांचा विळखा तसेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना ते अडचणीचे ठरत होते. समोरून येणारे वाहन न दिसणे, या झुडपांमुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहने पास करताना अपघात होणे अशा अनेक शक्यता निर्माण झाल्या होत्या. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले .

याकामी गावातील काही सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणारे तरुण एकत्रित येत रस्त्यावर मुरून टाकून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा केला. जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे-झुडपे काढत रस्ता सोयीचा केला. त्यामुळे या युवावर्गाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. यात प्रविण निकम, स्वप्निल निकम, अभिजित निकम, राहुल निकम, ईश्वर निकम, अरुण निकम, तेजस निकम, ललित निकम आदी युवकांचा यात समावेश आहे. तरुणांनी स्वखर्चाने जेसीबी लावून काटेरी झाडाच्या विळख्यातून रस्ता मोकळा केला. राजकारण विरहित सामाजिक बांधिलकी म्हणून केलेल्या कामाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव निकम, पीडी निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, दौलत निकम, नंदकिशोर निकम, संजय सावळे, महेंद्र आहेर आदींनी या उपक्रमाबद्दल युवकांचे अभिनंदन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here