विजेचा शॉकने मेंढी ठार ; मेंढमाल थोडक्यात बचावला

0
184
दहिवड येथे विजेचा धक्का लागून ठार झालेली मेंढी

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दहिवड ता देवळा येथील उमराणे रोड परिसरात विजेच्या धक्क्याने एक मेंढी ठार झाल्याची घटना घडली आहे .

दहिवड येथे विजेचा धक्का लागून ठार झालेली मेंढी

शुक्रवारी (दि ८) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दहिवड येथील दादाजी देवरे यांच्या मालकीच्या मेंढ्या उमराणे रोड परिसरात चरत असतांना यातील एका मेंढीला विजेचा धक्का लागल्याने ती जागीच ठार झाली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या मेंढपाळास तिव्र विजेचा धक्का लागलेला आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी याठिकाणी वीजप्रवाह सुरळीत केला .पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झाम्बरे यांनी पंचनामा केला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here