विजयनगर येथे पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन संपन्न

0
16

वाखारी गटाच्या जि.प.सदस्या मा.डॉ.सौ. नुतनताई सुनिल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातुन विजयनगर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन डॉ.आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विजयनगर गावाचा समावेश नऊ गाव पाणीपुरवठा योजनेत असल्याने सदर गावाला पिण्याच्या पाण्याचा नेहमी तुटवडा जाणवत होता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सदर गावाचा समावेश जलजिवन मिशन योजनेत करून नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली. या योजनेमुळे गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा) आहेर, मा.उपसरपंच शरद सागर, समाधान सागर, प्रभाकर निकम, दिपक निकम, केदा खैरनार, जीभाऊ निकम, शरद भामरे, दिपक निकम, रामचंद्र आहेर, भाऊसाहेब निकम, निलेश सूर्यवंशी, ग्रामसेवक खैर भाऊसाहेब आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here