वा रे बँक मॅनेजर!! खातेधारकांचे पैसे सट्ट्यात उधळले

0
47

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका बँक मॅनेजरने आपल्या खाते धारकांचे दीड कोटींहून अधिक रुपये सट्टा खेळून उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रत्येक सामान्य नागरिक आपले पैसे बँकेत ठेवत असतो. कारण बँकेत ते पैसे सेव्ह होत असतात किंवा मग सेफ असतात. पण मुंबईत एका खाजगी बँकेच्या मॅनेजरने आपल्या खातेधारकांचेच पैसे सट्टा खेळण्यात उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. थोडे थोडके नाही तर तब्बल 1.5 कोटींहून अधिक रुपये या बँक मॅनेजरने उधळले.

जुगार हा माणसाला देशोधडीला लावतो असे म्हटले जाते. मात्र इथे संपत्तीचे संरक्षणकर्त्यामुळेच अनेकांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे, हेच दिसते आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुंबईच्या दादर शाखेतील उपशाखा व्यवस्थापक विशाल गरुड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडलेल्या प्रकाराने सदर बँकेच्या खातेधारकांची मात्र झोप उडाली आहे.

आता या प्रकरणात पुढे काय होते? खातेधारकांचे पैसे परत मिळणार का? कधी? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here