द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वाहतूक नियमांची पायमल्ली ही आता सामान्य नागरिकांसाठी जणू नित्याचीच बाब झाली आहे. मात्र वाहतूक नियमांबाबत सदोदित काही ना काही पाऊले उचलली जात आहेत. आता पुन्हा एक कठोर पाऊल उचललं गेलं आहे.
वाहन धारकांना आता आपल्या सोबत PUC बाळगणे देखील सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. आणि याच अनुषंगाने प्रशासन काही ना काही पाऊले उचलत आहे.
आता देखील सरकार कठोर निर्बंध लादण्याचा मार्गावर आहे.
कार असो अथवा दुचाकी, प्रत्येक वाहन धारकाला आता आपल्या सोबत PUC बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर तुमच्याकडे PUC नसेल तर तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
वाहन धारकाकडे जर PUC नसेल तर त्यास कारावास आणि 10 हजारांचा दंड अशा शिक्षेस सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आता वाहन धारकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
वाहतूक नियम आणि पर्यावरण याबाबत शासन आता अधिक कठोर झाले आहे. वाहन धारकांनी पोलिसांना वैध PUC दाखवणे गरजेचे आहे. अवैध PUC दाखवल्यास वाहन धारकास दंड अथवा कारावास किंवा दोन्हीही अशा प्रकारच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल.
PUC अर्थात, प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे वाहनांसाठी खास प्रमाणपत्र दिले जाते. ज्यात दुचाकींसाठी आणि चार चाकी वाहनांसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येतात. हे प्रमाणपत्र आता वाहन धारकांना आपल्या जवळ बाळगावे लागणार आहे. अन्यथा दंडास सामोरे जावे लागेल.
वाहतूक नियमांबाबत सातत्याने वाहतूक पोलिसां द्वारे नियम लादले जात असूनही, वाहन धारक जुमाणण्यास तयार नाहीत. मात्र आता शासना द्वारेच कठोर निर्बंधांबाबत आदेश देण्यात आला आहे.
आता पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रशासन सतर्क झाले आहे. वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. आणि याच प्रदूषणास आळा घालण्याच्या दृष्टीने वाहन धारकांना आता PUC बंधन कारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते? लोक कसे यास प्रतिसाद देतात? याकडे बघणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम