
देवळा प्रतिनिधी ; तालुक्यातील वासोळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी दिलीप सूर्यवंशी यांची तर व्हा चेअरमन पदी कैलास भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वासोळ विकास सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि २) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी चेअरमन पदासाठी दिलीप सूर्यवंशी व व्हा चेअरमन पदासाठी कैलास भामरे यांचा अनुक्रमे एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी संचालक सर्वश्री स्वप्नील सूर्यवंशी, महादू गिरासे, दगा अहिरे, भिकुबाई गिरासे,कैलास भामरे,दयाराम खैरनार,अशोक केदारे,विक्रम बच्छाव ,सचिव प्रताप गिरासे, शिपाई राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे अशोक निकम , शिवाजी अहिरे, लहूसिग गिरासे,राजेंद्र निकम,केशव सूर्यवंशी आदींसह सभासदांनी अभिनंदन केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम