राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सिन्नर-विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या ओळख असलेल्या ग्रामपंचायत वासाळी येथे ग्रामपंचायत सरपंच काशिनाथ कोरडे,उपसरपंच पार्वताबाई जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नांनी व कामगार मंडळाच्या सहकार्यातून शिमगा महोत्सवाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते.
या शिमगा महोत्सवात ग्रामपंचायत कडून विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे व मान्यवरांच्या सत्कार समारंभ, सोमज येथील कला पथक, पथनाट्य-भारुड, सावकाराचा खून अश्या सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
शालेय चिमुकल्यां मुलींनी भरलेल्या हंडा कळशी घेत, लेजिम, सनई, चौघडे, संभळाच्या तालावर, आदिवासी कांबडा नृत्य सादर करत, सजवलेल्या बैलगाडीतून मान्यवरांची रॅली काढत फटाक्यांच्या आतशबाजीत गावातील ग्रामस्थांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान या कचरवाडी वासाळी गावातील शिमगा महोत्सवात विविध विकासकामे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मंजूर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत, प्रचितराया मंदिर भूमिपूजन (लोकवर्गणीतून), पंतप्रधान आवास घरकुल योजना ४३६ पात्र लाभार्थी यादी, वाघेवाडी ते वासाळी डांबरीकरण रस्ता, शुक्लतीर्थ ते मरीआई माता रस्ता, अंगणवाडी व किचनशेड दुरुस्ती कचरवाडी, शौचालय युनिट जि प प्राथमिक शाळा वासाळी, समाज मंदिर दुरुस्ती(दलित वस्ती)आदी विकास कामांसह अन्य मंजूर असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यासोबतच अत्यंत महत्वपूर्ण पूर्णत्वास असलेल्या राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजना, दलित वस्ती स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा वासाळी, लघु सभागृह वॉर्ड नंबर २,दशक्रिया विधी शेड,के टी बंधारा दुरुस्ती(कडवा नदी व चोंडी), वासाळी ते सूर्यवंशी वस्ती डांबरीकरण रस्ता, गावांअंतर्गत भूमिगत गटारी, अंगणवाडी क्रमांक १ दुरुस्ती, शाळा दुरुस्ती कचरवाडी, बंजाराविहीर दुरुस्ती, जि.प.शाळा दुरुस्ती वासाळी(भोजनशेड),वॉर्ड क्रमांक १ येथे विद्युत डी पी बसवणे यांसह इतर पूर्ण असलेल्या विकासकामांचे लोकार्पण आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमात ग्रामपंचायतने स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंतचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महत्वपूर्ण पाणी प्रश्न सोडविल्याने व गावातील महिलांच्या पाचविलाच पुजलेला असलेल्या संघर्षमय डोक्यावरचा हंडा खाली उतरविल्याने गावातील सर्व महिला माताबघिणी ग्रामस्थ व सरपंच काशीनाथ कोरडे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी सनई चौघडे ,संभळाच्या तालावर लेजिम खेळत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी कार्यक्रमाला जेष्ठ नेते रतन पाटील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.जि.प सदस्य बाळासाहेब गाढवे,राष्ट्रवादी चे नेते सुनील वाजे,बाळासाहेब भोर,खेड चे सरपंच लहानुबाई बाळू कचरे,टाकेद गावचे माजी सरपंच यशवंत धादवड, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, माजी जि प सदस्य केरू दादा खतेले, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, नारायण भोसले,
रतन बांबळे, गौतम भोसले, भाऊसाहेब भोसले, नामदेव भोसले,अनिल वाजे, सरपंच अशोक बोराडे, दिलीप पोटकुले, अशोक गभाले, उमेश ब-हे, गणेश दुर्गुडे, स्वीय सहाय्यक संजय डावरे, अरुण घोरपडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्धन झडे, केकरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सरपंच काशीनाथ कोरडे यांनी केले.
“देशातील एकमेव रोप वे सह भव्य दिव्य असे क्रांतीवर राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक कळसुबाई- वासाळी येथे होत आहे,भाम धरणातून उद्धभव घेऊन फिल्टरने टाकेद गटातील सर्व वाड्या वस्त्यांना शुद्ध व चांगले पाणी देण्यासाठी योजना मंजूर आहे, गटातील सर्वच रस्ते प्रश्न मी अर्थसंकल्पात मंजूर केलेले आहेत,चांगले शिक्षण, आरोग्य,पर्यटन, वीज,बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी माझी धारणा आहे.कडवा धरणासाठी देखील माझा प्रयत्न आहे.या शिमगा महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे विकासकामे करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.”
– माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर विधानसभा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम