
सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी आज सोमवारी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार नदीपात्रालगत असणाऱ्या रस्त्यावर चाऱ्या खोदून वाळू चोरीला पायबंध घालण्यात आला .

महसूल विभागाच्या या धाडसी निर्णयाचे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून,परिसरातील नागरिकांनी महसूल विभागाच्या या कारवाईचे कौतुक केले आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि , तालुक्यातील विठेवाडी ,लोहोनेर या ठिकाणी गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध्य रित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार विठेवाडी येथील नागरिकांनी सोमवारी (२४) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी त्यांच्याकडे केली होती . त्यानुसार महसूल विभागाने तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले . तसेच ज्या ठिकाणहू वाळूची चोरी केली जाते . त्या मार्गावरील रस्त्यावर जेसीबी च्या सहाय्याने चाऱ्या खोदण्यात आल्या . गेल्या अनेक दिवसांपासून गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास अवैध्य रित्या वाळू उपसा केला जात आहे .
याची तक्रार करून देखील महसूल व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत विठेवाडी येथील ग्रामस्थांनी केली होती . सोमवारी येथील शिस्टमंडळाने तहसीलदार सूर्यवंशी यांची प्रत्येक्ष भेट घेऊन यावर पायबंद घालण्याची मागणी केली . यावर तहसीलदारांनी तात्काळ निर्णय घेऊन चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करण्यात येत असलेला रस्त्यावर चाऱ्या खोदण्यात आल्या . या धाडशी निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून ,वाळू माफियांचे मात्र या कारवाईने धाबे दणाणले आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम