देवळा प्रतिनिधी : वाखारी गटाच्या जि.प.सदस्या मा.डॉ.सौ. नुतनताई सुनिल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातुन वार्शी येथे कोलती नदीवर फरशी पुलाचे बांधकाम करणे या कामाचा भुमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असणारे व नेहमी दुर्लक्षित असणारे विकासकामे जिल्हा परिषद सदस्य डॉ नुतनताई आहेर यांच्या कार्यकाळात पुर्ण झालेत यामधील प्रमुख काम म्हणजे वार्शी कोलती नदीवरील फरशीपुल बांधणे या कामाचे भुमीपूजन.
स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाची वर्षनुवर्षे मागणी, शाळेतील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पावसाळ्यात जीवाची कसरत करून नदी पार करून पुढे जाणे अशा अनेक समस्या निर्माण होत होत्या परंतु स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ.नुतनताई आहेर व सुनिल (गोटुआबा) आहेर यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सदर काम मंजूर करून घेतले व त्याचा भुमीपूजन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा) आहेर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयवंत भामरे , बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर बी चव्हाण, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार, पंचायत समितीचे डाटा ऑपरेटर तुषार थोरात, मा.सरपंच बळीराम वाघ, विजू नाना सोनवणे, नितीन सोनवणे, निंबा पवार, आप्पा पवार, बळीराम पवार, गोविंद सोनवणे, नंदन सोनवणे, दशरथ पवार, साहेबराव पवार, शांताराम पवार, परशराम पवार, धनंजय पवार, बापू सोनवणे, नितीन सोनवणे, भिका सोनवणे, कृष्णा सोनवणे, शरद पवार, ठेकेदार सुनिल देवरे, अशोक पवार, भीमा पवार, योगेश पवार, मुकेश पवार, दादाजी सोनवणे, केवळ पवार, काशिनाथ पवार, आबा पवार, जितेंद्र पवार, सुनील सोनवणे, सुमन पवार, पप्पू सोनवणे, सर्जेराव सोनवणे, प्रमोद पवार, सागर पवार, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम