वातावरण बदलामुळे मानवी आरोग्य धोक्याच्या उंबरठ्यावर

0
12

कीर्ती अरोटे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सध्या हवामान सतत बदलत आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वाढती थंडी तर कधी अचानक वाढणारे तापमान. सध्या सर्वत्र वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळतात. एकीकडे कोरोनाने हैराण केलय तर दुसरीकडे वातावरणातील बदलांमुळे मानवी आरोग्यावरही विविध परिणाम झाल्याने आरोग्य धोक्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.

निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी मात्र सततच्या हवामान बदलामुळे साथीचे आजार पसरायला सुरवात झालीय. डेंग्यू, चिकनगुनिया, टाईफाईड, वायरल इन्फेक्शन सारख्या आजाराने डोके वर काढल्याचे दिसून येते. लहान बालक, नवजात शिशू ते वयोवृध्द माणसांपर्यंत सर्वांना त्रास होताना दिसतो. दमा, मधुमेह, संधिवात, कमी रक्तदाब, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना या बदलत्या वातावरणाचा जास्त त्रास सहन करावा लागतो.

२०१५ सालच्या “लास्टेन कमीशन ऑन हेल्थ एंड क्लायमेट चेंज यांच्या अहवालानुसार प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या विविध बदलांमुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ, वायू प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास एवढंच काय तर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ ,वादळ, त्सुनामी यांसारख्या घटनांमुळे अप्रत्यक्षरीत्या कुपोषणातही वाढ होण्याची शक्यता असते. दुष्काळ, दुष्काळामुळे होणारी आर्थिक अडचण यांमुळे मानसिक आजार वाढल्याचे दिसून येते.

रोग प्रतिकार शक्ती चांगल्या असणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी प्रतिकार शक्ती असणाऱ्या लोकांमध्ये याचा जास्त परिणाम पाहायला मिळतो, बालदमा असणाऱ्या बालकांच्या आरोग्यावरही वातावरण बदलाचा प्रभाव दिसून येतो. अगदी प्राचीन काळात ४६० च्या दशकातही हिपिक्रेट्सने आपल्या ग्रंथात हवामान आणि आरोग्य यांचा एकमेकांशी असलेला थेट संबंध मांडला होता.

बदलत्या हवामानात घ्यावयाची काळजी :
• आपल्या आसपास स्वच्छता बाळगणे
• उकळून गार केलेले पाणी पिणे
• सार्वजनिक ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे
• आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here