देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्याच्या वाजगाव विकास सोसायटी निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली जात आहे.
उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असले, तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी गावातील नागरिकांद्वारे केली जात आहे. नागरिकांद्वारे होत असलेल्या या मागणीसाठी रामदास देवरे, रमेश खैरणार, योगेश आहेर, संदीप देवरे यांनी याबाबत मागणी करतांना, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून गावातील वाद-विवाद टळतील आणि एकोप्याने गाव नांदेल असे म्हटले आहे.
मात्र प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत दाखल झालेल्या 51 उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी होणार आहे. त्यानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. यामुळे आता या बिनविरोध निवडणूक करवण्याच्या मागणीचा काही उपयोग होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम