वाखारी येथे शहीद पोलीस दिन साजरा

0
46

दादाजी हिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वाखारी ता देवळा येथील श्री पिंपळेश्वर महाविद्यालयात पोलीस शिपाई संजय भामरे यांचा शहीद दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संजय भामरे यांच्या प्रतिमेस आई रेश्माबाई दौलत भामरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शहीद पोलिस शिपाई संजय दौलत भामरे यांनी श्री पिंपळेश्वर महाविद्यालय प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ,पुढील शिक्षण श्री मा श्री रामरावजी महाविद्यालय देवळा येथे सुरु असताना केंद्रीय सीमा सुरक्षा दलात ते पोलिस शिपाई म्हणून रुजू झाले होते. भारत पाकिस्तानच्या सीमेवरील भाटगाव येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात अवघ्या चोवीस वर्ष वय असलेले संजय भामरे शहीद झाले होते.

त्यांनी आपल्या पथकातील सहकार्‍यांसोबत पाचपेक्षा अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते
यावेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करत असतांना दिनांक 24-2-1995 रोजी त्यांनी देश सेवेसाठी बलिदान दिले देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या संजय भामरे विर जवानाला शहीद पोलीस दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आई रेशमाबाई, दौलत भामरे, भाऊ कारभारी दौलत भामरे, मोठा भाऊ दौलत भामरे, पोलीस आर एम राठोड, पोलीस कॉन्स्टेबल बाळू जाधव, किरण भामरे, संकेत भामरे, रवींद्र भामरे रवी बाबा चव्हाण , पिंपळेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here