वाखारी गटात विविध विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण

0
188

देवळा प्रतिनिधी : वाखारी गटाच्या जि.प.सदस्या डॉ. नुतन आहेर यांच्या प्रयत्नातुन वाखारी गटातील मौजे. गुंजाळनगर, देवळा मटाणे, भऊरफाटा, वरवंडी, येथील पुढील नमुद विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात प्रामुख्याने गुंजाळनगर येथे नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे, गुंजाळनगर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, गुंजाळनगर येथे भूमिगत गटार बांधणे, श्री नांदूरेश्वर महादेव मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे, गुंजाळनगर ते सुभाषनगर रस्ता सुधारणा करणे, जि.प.विद्यानिकेतन पब्लिक स्कुल देवळा इमारत दुरुस्ती करणे, मौजे मटाणे येथे नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे, मटाणे येथे भुमिगत गटार बांधकाम करणे,राज्य मार्ग 22(भऊर फाटा) ते खर्डे (वा.) रस्ता सुधारणा करणे, मौजे. वरवंडी नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे, वरवंडी जि.प.प्रा शाळा इमारत बांधकाम करणे, वरवंडी ते दत्त नगर रस्ता सुधारणा करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गटातील प्रत्येक गावात भरीव विकासकामे केलेली असून यामुळे गुंजाळनगर , विद्यानिकेतन पब्लिक स्कुल, मटाणे,भऊर फाटा, वरवंडी अशा विविध ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नुतन आहेर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा) आहेर, देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख, अनिल दादा गुंजाळ, चिंतामण आबा गुंजाळ, हिरामण गांगुर्डे, भिवसन गुंजाळ, सतिश गुंजाळ, डॉ.संजय निकम, डॉ.राजेंद्र गुंजाळ, दीपक जाधव, बापू जाधव, प्रविण गुंजाळ, विनोद आहेर, योगेश पाटील, दिपक पानपाटील, भाऊसाहेब देवरे, नंदू गुंजाळ, बापू देवरे, भाऊसाहेब आहेर, समाधान केदारे, जनार्धन आहेर, केदाबाई सुर्यवंशी, दिनेश आहेर, हेमंत आहेर, नानाजी आहेर, गंगाधर केदारे, दादाजी केदारे, प्रविण मोरे, समाधान आहेर, चंद्रकांत आहेर, नानाजी आहेर, विठोबा देवरे, रावसाहेब वाघ , संदीप बच्छाव, भारत वाघ, चंद्रकांत चव्हाण, अमलोक शिंदे, आधार शिंदे, बंडू चव्हाण, निखिल चव्हाण, भाउदास गवळी, बंडू वाघ इ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here