वाखारवाडी उपसरपंचपदी रविंद्र निकम बिनविरोध

0
18
रवींद्र निकम यांचा सत्कार करताना कि . वा . निकम आदि

देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील वाखारवाडी (श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रविंद्र निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाखारवाडी (श्रीरामपूर) ता.देवळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रत्ना संदिप निकम यांनी आपल्या पदाचा आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच दिपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१३) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

रवींद्र निकम यांचा सत्कार करताना कि वा निकम आदि

ग्रामविकास अधिकारी वैशाली येळीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदाकरिता नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या विहित कालावधीत रविंद्र शंकरराव निकम यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीमध्ये कायम झाल्यानंतर उपसरपंचपदी रविंद्र निकम यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला .

यावेळी कि.वा.निकम,सरपंच दिपक पवार, ग्रामपंचायत सदस्य शोभा निकम, डॉ.चंद्रकांत निकम, बाळासाहेब निकम, संदिप निकम, रमेश निकम, विष्णू निकम, रत्ना निकम, भिवसन पवार, लिलाबाई पवार, शोभा पवार, कडू मगर, सुनील निकम आदिंसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन, सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित उपसरपंच रविंद्र निकम यांनी व्यक्त केली.

उपसरपंचपदी रविंद्र निकम यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मविप्रचे संचालक डॉ.विश्राम निकम,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर,नगरसेवक संभाजी आहेर,जाणीव पतसंस्थेचे चेअरमन जितेंद्र आहेर, खुंटेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पगार, देवळा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रशांत निकम, देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, आदर्श बालरुग्णालयाचे संचालक डॉ.सतीश वाघ, डॉ.संजय निकम, डॉ.कोमल निकम, डॉ.पंकज निकम, अरुण पवार, डॉ.अजय वाघ , डॉ. निशांत गांगुर्डे, प्रा.श्याम कापडणीस, रोहित पवार , प्रशांत पवार , प्रा.स्वामी पवार आदींनी अभिनंदन केले.

रविंद्र निकम हे माजी उपसरपंच कै .शंकरराव निकम व आई विद्यमान सोसायटी संचालिका तुळसाबाई निकम यांचे चिरंजीव व. मविप्रचे संचालक डॉ. व्हि एम निकम यांचे पुतणे होत.या निवडीने रवींद्र निकम यांनी राजकीय वारसा टिकवून ठेवला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here