द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लैंगिक शोषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
मागील काही काळापासून देशात लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत.
अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. मनुष्याच्या क्रूरतेचा कळस, बऱ्याचशा घटनांमध्ये दिसून आला आहे.
मात्र देशात अद्याप देखील या प्रकरणांबाबत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही.
निर्भया प्रकरणापासून आत्ता पर्यंत मोठ्या प्रमाणावर घटना घडून गेल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने पॉस्को कायद्यात शरीराला शरीराचा स्पर्श होईल, तरच लैंगिक अत्याचार होतो. अशी व्याख्या करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाला खोडून काढत, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
शरीराशी थेट संपर्क झाला नाही, म्हणून लैंगिक अत्याचार होत नाही. असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता.
अल्पवयीन मुलीच्या शरीराला वस्त्रांवरून स्पर्श झाल्याने, संबंधिताला सर्वोच्च न्यायालयाने दोषी सांगितले आहे.
मुलीच्या वस्त्रांना संबंधिताने स्पर्श केल्याने, तो लैंगिक शोषण प्रकरणात दोषी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने लैंगिक अत्याचार प्रकरणात अजून एक ठाम निर्णय घेण्यास पाठबळ मिळणार आहे.
देशात वाढत्या लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. त्यात संबंधित व्यक्तींवर सुरू असलेले खटले निकाली लागलेले नाहीत.
निकालास उशीर होत असल्याने, नागरिक संताप ही व्यक्त करताय. कोणता तरी ठोस कायदा, अत्याचार प्रकरणात असावा अशी मागणी सामान्य नागरिकांद्वारे केली जातेय.
ही बातमी वाचलीत का?
शरद पवार काय म्हणाले?
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. आणि त्यांना नुकतीच 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील बऱ्याच काळापासून सुरू असलेले, वसुली प्रकरण अद्याप देखील निकाली निघालेले नाही.
या प्रकरणाची सुरुवात झाली ती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पासून.
त्यानंतर मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लेटर बॉम्ब फोडत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली प्रकरणाचे आरोप केले.
देशमुखांच्या त्रासाचा एक – एक मिनिट वसूल केला जाऊन, बदला घेतला जाईल. सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत. असे पवारांनी म्हटल्याचं बोललं जातंय.
पुढे वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
देशमुखांच्या त्रासाचा मिनिट अन मिनिट वसूल करणार ; वस्तुस्थिती ठाऊक आहे – शरद पवार https://thepointnow.in/?p=2844
https://chat.whatsapp.com/D2yKDtyBmeW2S01C6AMqMa
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम