देवळा प्रतिनिधी : शेत शिवारात जाण्यासाठी रस्त्यांची समस्या हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांनी जातीने लक्ष घातले . शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन पानंद रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील वरवंडी येथील चिंच नाल्याजवळ पानंद रस्ता अत्यंत खराब असल्याने व पावसाळ्यात पाणी असल्यावर ट्रॅक्टर व इतर चार चाकी वाहने घेऊन जाता येत नसल्याने भाव असून देखील शेतमाल मार्केटला नेणे शक्य होत नव्हते, ही बाब येथील शेतकरी किरन बिरारी यांनी सुनील आहेर यांच्या लक्षात आणून दिली.
स्थानिक शेतकरी बांधवांची दि.२५ जानेवारी रोजी त्यांनी बैठक घेऊन समन्वयाने मार्ग काढला लोक सहभाग व स्वतः जेसीबी मशीन देऊन दि.१ फेब्रुवारी रोजी सदर रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर यांच्या हस्ते करण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, सरपंच भाऊदास गवळी, किरण बिरारी, समाधान चव्हाण, सुनील चव्हाण, बापू चव्हाण, गणेश गुजरे, भाऊसाहेब चव्हाण, योगेश चव्हाण, बंडू चव्हाण, गणू वाघ, मनोज देशमुख, मुण्णा जाधव, मयूर सोनवणे, आकाश थोरात आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम