वन विभाग अनुदानावर आदिम कातकरी कुटुंबांना गॅस योजनेचा लाभ द्यावा

0
34

सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : दुर्गम डोंगराळ भागात परंपरागत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचा पाहिजे तसा विकास अद्यापही झालेला दिसत नाही. अश्या दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावावे ,पर्यावरणाची हानी होऊ नये,स्रियांसह कुटुंबातील सर्व सदस्याला आरोग्याच्या समस्या उदभऊ नये यासाठी मोदी सरकारने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्वला ही नवीन योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना मोफत घरगुती गॅस जोडणी दिल्या गेली व आजही दिल्या जात आहे. याच पद्धतीने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद व परिसरातील डोंगर माळरानावर वास्तव्यास असलेल्या आदिवासी आदिम कातकरी कुटुंबांना आजही घरगुती गॅस माहीत नाही. याच कुटुंबांचे जीवनमान उंचवावे व त्यांचा विकास व्हावा या हेतूने वन विभागा मार्फत आदिवासी विकास विभागाकडून अनुदानावर सदर गोरगरीब गरजू कुटुंबांना नवीन गॅस जोडणी देण्यात यावी या मागणीचे ग्रामपंचायत टाकेद बु चे मागणी पत्र नुकतेच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिम कातकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने इगतपुरी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना दिले आहे.

सद्याच्या परिस्थितीत सर्वत्र प्रचंड जंगलतोड होत असल्याने ती थांबविण्याकरिता व जंगलाचे रक्षण करण्याकरिता वनविभाग अनुदानावर गरजू पात्र ग्रामस्थांना गॅस जोडणी देण्यात येत आहे. जी गावे जंगलाला लागून आहे अश्या गावातील ग्रामस्थांना आपल्या मोफत गॅस योजनेचा लाभ होत आहे. ग्रामीण भागात अनेक नागरिकांच्या घरी गॅस जोडणी नसल्याने जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्याचा स्वयंपाक सरपणाकरिता सर्रास वापर करतात. त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते. ही बाब लक्षात घेऊन आपल्या वनविभागाने गॅस सिलिंडरसाठी आता अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही. मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही. या अपेक्षेने आपल्या वनविभागाने ही योजना आखली आहे. आपल्या सूचनेनुसार दरोगा व वनपाल यांना सूचना देखील दिलेल्या आहेत. वनपाल गावागावात जाऊन वन विभागाकडून गॅस जोडणी मिळणार असल्याचे ग्रामस्थांना सांगत आहे. तरी या दृष्टीकोनातून ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना आदिम कातकरी कुटुंबांना आपल्या विशेष योजनेअंतर्गत गॅस योजनेचा लाभ देण्यात यावा असे टाकेद बु ग्रामपंचायतच्या गॅस जोडणी मागणी पत्रात म्हंटले आहे.

दरम्यान इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात रहिवास असणाऱ्या आदिम कातकरी कुटुंबियांना वनविभागाच्या प्रयत्नांतून आदिवासी विकास विभागाकडून अनुदानावर नवीन गॅस जोडणी देण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी,सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, टाकेदच्या सरपंच सौ ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी एस भामरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन बिरारीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here