लोहोणेर येथे अनेकरुपी महाराजांचे हजारोंच्या संख्येत धर्म प्रवचन सोहळा संपन्

0
9
लोहोणेर येथे अनेकरुपी महाराजांचे स्वागत करतांना भाविक

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; श्री भगवंत शिवतिर्थ नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थान तिर्थक्षेत्र बिलमाळ – तुलसीगड गुजरात येथील शिवपार्वती साक्षात्कार झालेले मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य संत अनेकरूपी महाराजांचे देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले तर लोहोणेर गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

मिरवणुकीत, कलशधारी महिला, तुळशीवृंदावन भजनी मंडळ, बँण्ड, ढोलताशा पथक, कोकणी वाद्यं शिवभक्त, अनेकरुपी महाराजांचे भक्त आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहोणेर येथे अनेकरुपी महाराजांचे स्वागत करतांना भाविक

मिरवणूक ज्या भागातून जाणार होती त्या रस्त्यावर सडा-रांगोळी काढण्यात काढण्यात आल्या तर घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या गावातुन भक्तांनी हर हर महादेव, च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता, संपूर्ण गांव भावभक्तीत न्हाऊन निघाला होता.

अनेकरुपी महाराज व्यसन मुक्ती चे प्रणेते असुन, दारु सारख्या नशेच्या आहारी गेलेल्या तरुण, जेष्ठ मंडळीला दारु सारख्या व्यसनापासून महाराजांनी मुक्त केले आहे. खऱ्या अर्थाने समाजात व्यसनमुक्ती सारखे समाजकार्य मोफत करून सर्वसामान्य माणसाला चांगल्या मार्गाला लावले आहे.
महाराजांचे व्यसनमुक्ती चे कार्य अविरतपणे विनामूल्य अविरतपणे चालू आहे.
महाराजांनी आपल्या प्रवचनात, हिंदू संस्कृती महान आहे .

महाराष्ट्र ही संताची व पवित्र भुमी आहे.
भगवान शिव पार्वती यांनी सृष्टी ची निर्मिती केली असुन, कोणीही संपत्ती वर गर्व करु नका, सत्कर्म करून या जन्माचा उध्दार करूण घ्या. व्यसनापासुन दुर रहा महाराजांच्या वाणी व प्रवचनात भाविक भक्त मंत्र मुग्ध झाले होते.
या वेळी

लोहोणेर ग्रामस्थांनी महारांजाचा सत्कार केला .
कमलादेवी मंदिर परिसरात महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते…
लोहोणेर येथील भव्यदिव्य कार्यक्रम पाहून महाराजांनी लोहोणेर ग्रामस्थांचे तसेच अनेकरुपी अर्धनारेश्वर भक्तांचे मनापासून आभार मानत सर्वाचे अभिनंदन केले.

प्रवचन संपन्न होताच सर्व भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था बाजुच्या मंडपात करण्यात आली होती.
मंडप डेकोरेशन, लांईटीगं, साऊंड सिस्टीम, पाणी आदी व्यवस्था भक्तांनी मोफत पुरवल्या होत्या.
मिरवणूक तसेच प्रवचन सोहळ्याचे आयोजन शिवभक्त, अनेकरुपी महाराजांच्या भक्त परिवाराने आयोजित केले होते..

दारू पिऊन अनेक कुटुंबातील व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून समाजातील अशा लोकांनी दारू तसेच वाईट प्रवृत्ती पासून दूर राहुन कुटुंबांचे कल्याण व्हावे म्हणून दारु तसेच वाईट गोष्टी पासून दुर राहावे.
– अनेकरुपी महाराज


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here