द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा तालुक्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. ग्रामीण भागात कुठे गावठी दारू तर कुठे अन्य गैरकारभार सुरू आहेत, हे सर्व कमी की काय आता लोहणेर येथे पुलाखाली सटाणा – देवळा हायवेवर मटका सुरू असल्याचे पुरावे ‘द पॉईंट नाऊ’ च्या हाती लागले आहेत. हे सर्व पोलिसांच्या नजरेसमोर की नजर चुकवून सुरू आहे याबद्दल मात्र शंका आहे.
तालुक्यातील अशा अवैध धंद्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हे पोलिसांनी शोधलं पाहिजे, तरूणाईसह अनेक नागरिक या वाम मार्गी गेल्याने अनेक संसार उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याचे बघून पुन्हा 4 ते 5 दिवसापासून मटका सुरू झाल्याची माहिती ‘द पॉईंट नाऊ’ च्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले आहे.
देवळा तालुक्यात लोहणेर हे गाव नेहमीच चर्चेत असते कधी वाळू उपसण्यासाठी तर कधी मटक्या साठी, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन भविष्यात होणारे गैरकारभारविरुद्ध कठोर कारवाई करावी जेणेकरून असे धंदे कोणी करण्याची हिम्मत करणार नाही. कुणाचा वरदहस्त असल्यास त्याचे नाव देखील समोर येन गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम