सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तालुक्यातील लोहोणेर येथील प्रगतीशील शेतकरी कमलाकर रघुनाथ नेरकर यांच्या मळ्यातील विहिरीत (दि २६ ) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बिबट्या आढळल्याने सर्वत्र भीती व्यक्त केली जात होती.
अखेर रात्री पावणे दहा वाजता बिबट्या ला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वन विभागाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न करून रात्री उशिरापर्यंत बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
गर्दी हटविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याना बोलविण्यात आले. लोहोणेर ता देवळा येथील प्रगतीशील शेतकरी कमलाकर नेरकर यांच्या मळ्यातील गट नंबर ९९२ मध्ये घरालगत विहीर आहे. नेरकर हे सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विद्युत पंप बंद करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता विहिरीत बिबट्या पडला असल्याचे प्रथम दर्शनी च्या लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बिबट्या ची वार्ता वाऱ्या सारखी गावात पसरताच बघ्यानी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर गर्दी हटविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. वन विभागाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम