लोक बाभळीच्या झाडाला कधीच दगड फेकून मारत नाही, आंब्याच्या झाडालाच मारतात – झिरवळ

0
41
खर्डे ता देवळा येथे वळण योजनेच्या भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी उपस्थित ना नरहरी झिरवाळ समवेत व जि प उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड ,जि प सद्स यशवन्त शिरसाठ , नूतन आहेर , पुरुषोत्तम कडलग ,सुनील आहेर ,संदीप पवार, सुभाष मोरे आदी . (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा प्रतिनिधी : `भाग्यवान होण्यासाठी जन्माला यावे लागते ऐशी वर्षाच्या माणसाला दिलेला शब्द पाळून त्याचे नामकरण होत आहे. हि खरी त्यांना श्रद्धांजली मिळाली असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे अध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांनी आज( दि २९) रोजी खर्डे येथे केले .

खर्डे ता देवळा येथे वळण योजनेच्या भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी उपस्थित ना नरहरी झिरवाळ समवेत व जि प उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड ,जि प सद्स यशवन्त शिरसाठ , नूतन आहेर , पुरुषोत्तम कडलग ,सुनील आहेर ,संदीप पवार, सुभाष मोरे आदी . (छाया – सोमनाथ जगताप)

खर्डे ता देवळा येथे स्थानिक नाल्यावर बंधारा बांधून पाणी कोलथी नाल्यात टाकणे या “मुरली पंत”: वळण योजनेचा भूमिपूजन समारंभ ना झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा ,जि प सदस्य यशवंत शिरसाठ , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ,जि प सदस्या नूतन आहेर , प स सभापती शांताबाई पवार , तहसीलदार विजय सूर्यवंशी , प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील , गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव उपस्थित होते .

प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांनी केले . यावेळी छत्रपती पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप पवार ,डॉ सयाजीराव गायकवाड , नूतन आहेर , यशवंत शिरसाठ ,पुरुषोत्तम कडलग, महेंद्र शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .

यावेळी ना झिरवाळ पुढे म्हणाले कि , सुनील आहेर यांचे काम नाविन्य पूर्ण असून ,विरोध कोणाला नसतो ,कोणाला विरोध नाही असे सांगा ,लोक भाबळीच्या झाडाला कधीच दगड फेकून मारत नाहीत . आंब्याच्या झाडालाच दगडफेकून मारतात . त्यामुळे आपण आंब्याचे झाड म्हूणन उभे रहा ,निश्चित यश मिळेल . जि प सद्स नूतन आहेरांनी या भागातील जनतेला आशेचा किरण दाखविला असून ,याचा इतर ठिकाणी आदर्श घेता येईल .

शरद पवारांच्या विचारावर ,अजित दादांच्या तालमीत व छगन भुजबळ यांच्या दूरदृष्टीत सुनिल आहेर व नूतन आहेर कामकाज करीत असल्याने याचा निश्चितच फायदा होईल . कार्यक्रमास प्रहारचे भाऊसाहेब मोरे ,बापू देवरे , संदीप पवार,रामकृष्ण कुवर , बंडू (नितीन ) देवरे,भाऊसाहेब देवरे ,सुभाष मोरे, मुन्ना जाधव , रत्नमाला देवरे , माजी सरपंच नारायण जाधव , माजी उपसरपंच मिराबाई मोरे , माजी चेअरमन शिवाजी जाधव, माजी उपसरपंच राहूल देवरे, ग्रामपंचायत सद्स गोकुळ जगताप , नानाजी निकम , किशोर पवार , संगीता मोरे , प्रफुल्ल पवार ,भिला पवार, सचिन बत्तासे ,समाधान देवरे, शामभाऊ पवार ,प्रवीण देवरे , निलेश पवार ,भाऊसाहेब महादू मोरे ,माधव ठोंबरे , सुभाष बर्वे ,आबा सावकार , नानाजी मोरे , काकाजी मोरे ,नारायण जाधव, उत्तम मोरे , निंबा निकम , प्रवीण गुंजाळ , महेंद्र देवरे, मटाले मामा , भगवान देवरे, डॉ बी डी ह्यालीज , राजाराम गांगुर्डे , राहुल पवार , माणिक निकम आदींसह वाजगांव ,खर्डे, मुलूखवाडी,मटाने आदी ठिकाणचे लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार किशोर खरोटे यांनी मानले .

खर्डे येथील वळण योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी संबंधित जि प च्या लघु पाटबंधाबरे विभागातील अधिकारी , कर्मचाऱ्यांनी आपली अनुपस्थिती दर्शविल्याने त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला . उपाध्यक्ष गायकवाड यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली . अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने अनेक मान्यवरांनी खंत व्यक्त केली . ना झिरवाळानी देखील या मुजोर अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याने काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here