द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोना काळात अनेक संकट येत असताना सर्व सामान्य प्रवाशांना लोकल ने प्रवास करण्यास बंदी होती मात्र आता दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करता येईल अशी बातमी सरकार काढून देण्यात आली असतानाही प्रवाशांचा नाईलाज झाला आहे. प्रवासासाठी लोकांना तिकीट काढण्यास अडचणी येत असल्याच समोर आलं आहे.
तिकीट काढण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशाला स्वयंचलित तिकीट यंत्रणा बंद असल्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मात्र या रांगेत उभे असताना प्रत्येक प्रवेशाचे दोनही डोस पूर्ण आहेत का ? हे पहिल जात आहे.
प्रवाशाला मासिक पास किंवा दैनिक तिकीट देण्यापूर्वी तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचारी त्यांचे युनीव्हर्सल पास किंवा लसीच्या दोन्ही मात्र पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तपासतात हे प्रमाणपत्र तपासल्या नंतरच तिकीट किंवा पास दिला जातो. त्यामुळे तिकीट घेण्यास मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यामुळे गर्दी होताना दिसून आली. पुढे रेल्वे ने प्रवास करतानाही मोट्या प्रमाणात गर्दी आढळली आणि त्या मुळेच कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास उशीर होत असल्याच समोर आलं आहे.
मात्र कोरोना प्रतिबंध लशीची एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांना अध्यापही प्रवास दिला जात नाही, दुसरीकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्या मुळे प्रवाशांचा भर रेल्वे वाहतुकीवर आलेला आहे. तिकीट खिडक्यांवर गर्दी होत आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने तात्काळ ‘जेटीबीएस’ सेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम