लासलगाव ग्रामपंचायत तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाईना अभिवादन

0
132

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : लासलगाव वार्ड नंबर 3 मध्ये ग्रामपंचायत जिम्नॅशियम हॉल या ठिकाणी स्त्री समाज सुधारक व स्त्री शिक्षणाचे जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 जयंती व भारतीय स्त्री मुक्ति दिन व महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला दक्षता समिती अध्यक्षा सौ.वेदीकाताई जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी महीला दक्षता समीती अध्यक्षा वेदीकाताई होळकर तसेच कार्यक्रमाचे आयोजन कर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटक फरिदा अनिस काझी तसेच कार्यक्रमास उपस्थित वनस्थळी अनिता गंधे डॉ. संगीता सुरसे , वैशाली जाधव, मंजुषा पाटील, सुनिता भामरे कुमावतबेलदार समाजाचे अध्यक्षा उषा कुमावत, सुरेखा सदगीर, रंजना झाल्टे, आरती कोल्हे, अनिता खैरे, अर्चना परदेसी ,डेरले ताई , शोभा पाटील, प्रमिला लोणारी, चैताली वाघ, आशा साखरे , मंगल सोळसे, योगिता आंबेडकर, अर्चना दीक्षित, संगीता गुंजाळ यांच्या सह महिला उपस्थित होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here