लासलगावयेथे नाताळ सण साधेपणाने साजरा

0
12

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : बच्चे कंपनीला ‘गिफ्ट्स’ देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा ‘सांताक्लॉज’ यांनी ख्रिसमस संदर्भात संदेश दिला व संपूर्ण जगासाठी शांतता व आरोग्यासाठी प्रार्थना केली.सांताक्लॉज च्या हस्ते लहान मुलांना भेटवस्तू व चॉकलेट देण्यात आले.
प्रभू येशू खिस्तांचा जन्मदिवस खिसमस ( नाताळ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा  नाताळ सण साधेपणाने साजरा करण्यात आला.

लासलगाव सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायस्कूलमध्ये नाताळ सण (ख्रिसमस) अगदी शांततेत आणि सर्व सुरक्षा साधनासह साजरा केला .

यावेळी शाळेचे प्रिन्सिपल जोसेफ खंडागळे, हेडमास्टर एन. जे. मोहनराव, खजिनदार सुहास विल्सन, पास्टर पि.टी. खाजेकर, दिपक बाबरे यांनी पवित्र बायबल मधील वचनांच्या आधारे नाताळाचा संदेश दिला. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता प्रभू येशू यांच्या प्रेम, त्याग आणि स्नेहाच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू येशू हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी या जगात आले, त्यांनी जगाला प्रेम, शांती, स्नेह आणि त्यागाची शिकवण दिली, त्याचेच अनुकरण करण्याची गरज असल्याचे जोसेफ खंडागळे म्हणाले.

यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी समूह गीत सादर केले. सांताक्लॉजचे स्वागत सुहास विल्सन यांनी केले सांताक्लॉज लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले या वेळी सर्वांना केक वाटप करण्यात आला नाताळ निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या एन. जे. मोहनरावनी सर्वांचे आभार मानले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here