प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : निफाड येथील वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये इयत्ता नववी वर्गात शिकत असलेली लावंण्या निलेश शिंदे हीने निफाड एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव बसवंत द्वारे आयोजित केलेल्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय स्कॉलरशिप परिक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
लावण्याच्या यशाबद्दल संंस्थेचे उपाध्यक्ष संजयजी मोरे , माजी आमदार नानासाहेब बोरस्ते ,पत्रकार विश्वास देवकर , बाळासाहेब बनकर , अविनाश देशमाने , कार्यकारी संचालक दिनेश अनारसे , प्राचार्य भंडारे , मिनाक्षी जाधव यांच्या शुभहस्ते तीला रोख नऊ हजार रुपये , सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
निफाड एज्युकेशन सोसायटी आयोजित राज्यस्तरीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परिक्षेत राज्यभरातील १३६ शाळेतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांमधून लावंण्या निलेश शिंदे हीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
लावंण्या ही निफाड केंद्राचे केंद्रप्रमुख तथा निफाड नं १ शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश शिंदे सर व सौ योगिता शिंदे यांची कन्या आहे.अगोदर लावंण्या हीने एम टी एस परिक्षेत राज्यात द्वितीय,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय , राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे रुपये तीन हजार रुपयांचे पारितोषिक, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांमध्ये यश संपादन केले आहे.
लावंण्या हीच्या यशाबद्दल तीचे नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर, आमदार दिलीपराव बनकर , गटविकास अधिकारी संदीप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे, वसंत गायकवाड , प्राचार्य डॉ पी व्ही रसाळ , प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अंबादास वाजे , जिल्हा अध्यक्ष अर्जुन ताकाटे , वैनतेय विद्यालयाचे कार्यकारी विश्वस्त वि दा व्यवहारे सर रतनतात्या वडघुले तालुका अध्यक्ष संतोष मेमाणे, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य संतोष गोरवे निफाड इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सुभाष महाजन , सुरेश धारराव, विजय डेर्ले, प्रदीप शिंदे कुमार जंगम ,निंबा बोरसे , शिक्षक समितीचे राज्य नेते पांडुरंग कर्डिले , अविनाश बागडे भास्कर भदाणे , प्रमोद क्षिरसागर धर्मेंद्र सोनवणे प्रविण कोळी सुनील आहेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निफाड नं १ शाळेतील सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम