द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेला संप आज अखेर मिटला असून, लालपरी धावणार असल्याने सर्वसामान्यांचे हाल आता थांबणार आहेत, संप मिटल्याची घोषणा अनिल परब यांनी केला आहे.
विलीनीकरणा संदर्भात समितीचा अहवाल अजून येणे बाकी आहे. जो निर्णय येईल तो अहवाल सरकार मान्य करणार आहे. अशी माहिती परब यांनी दिली. विलीनीकरण होईपर्यंत पगार वाढ देण्यात येत आहे.
जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष या वर्गात आहेत यांच्या वेतनात 5 हजार पगार वाढ करण्यात आली आहे. 10 ते 20 वर्ष या वर्गात 4 हजारांची वाढ झाली आहे. 20 वर्ष व त्याहून अधिक या वर्गात 2 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
शीस्थ रहावी म्हणून अटी कायम राहतील, मात्र कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार अशी माहिती परब यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Please start the bus