नाशिक प्रतिनिधी : वैशाली झनकर यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अंतरिम जामिनासाठी त्यांनी अर्ज केला असून थोड्या वेळाने पुन्हा यावर सुनावणीची शक्यता आहे. या निर्णयाकडे शिक्षण विभागासह राज्यांचे लक्ष लागून आहे.
गेल्या आठवड्यात डॉ झनकर यांना लाच घेतांना रंगेहात पकडले होते. लाच प्रकरण उजेडात आल्यानंतर फरार झाल्या होत्या. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
आज पुन्हा न्यायालयात झनकर यांना हजर करण्यात आले. दरम्यान यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत केली आहे. जर न्यायालयाने अर्ज फेटाळला तर त्यांना पुढील १४ दिवस नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे त्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता अधिक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम