लाऊडस्पीकरच्या वादात रामदास आठवलेंची उडी, म्हणाले- मशिदीतून काढले तर…

0
19

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरबाबतचे राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. लाऊडस्पीकरच्या वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात राजकारण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. लाउडस्पीकरचे काय करायचे याचा विचार मुस्लिम समाज करू शकतो, पण मला वाटते एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवरात्री आणि इतर सणांमध्ये लाऊडस्पीकर चालतात. मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. राज ठाकरेंना मंदिरातही लाऊडस्पीकर लावायचे असतील तर ते लावू शकतात. मशिदीतील लाऊडस्पीकर बाहेर काढल्यास रिपब्लिकन पक्ष आंदोलन करेल.

राज ठाकरेंनी सरकारला दिला अल्टिमेटम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, ‘राजकीय सभेसाठी लाऊडस्पीकर लावायचे असतील तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते आणि मशिदींमध्ये दिवसातून 5 वेळा लाऊडस्पीकरवर अजान दिली जाते, त्यासाठी काही नियम असो वा नसो. त्यांना रोज कोण परवानगी देतो? आजपर्यंत सर्वजण या गोष्टी सहन करत आले आहेत. आता पुरे झाले. लोकांनी, विशेषत: मुस्लिम समाजाने समजून घेतले पाहिजे, ही धार्मिक बाब नाही, ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यावर आता निर्णय घ्यावा लागेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here