लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोरोनाच्या (Cowid) प्रकोपा नंतर सगळीकडेच हाहाकार माजला होता. ज्यामुळे संपूर्ण जगाची व्यवस्था खिळखिळी झाली. मात्र कालांतराने सर्व देश आपापल्या परीने लस (Vaccine) तयार करण्याच्या मागे लागले. त्या अनुषंगाने लस तयार होऊन जगभरात (World) देने देखील सुरू झाले.

भारतात (India) देखील आज घडीला लसीकरण जोरात सुरू आहे. मात्र हे लसीकरण प्रौढांसाठी आहे. लहान मुलांसाठी (Children) अद्याप लस उपलब्ध झालेली नव्हती. मात्र आता लवकरच लहान मुलांसाठी देखील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. कोव्हॅक्सीन (Covaxin) च्या लहान मुलांसाठी येऊ घातलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत बायोटेक (Bharat Biotech) द्वारे या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. यासंबंधी कंपनीचे एम. डी. कृष्णा मुल्ला यांनी माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे लवकरच लहान मुलांसाठी देखील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अनेकांना जीव गमवावा लागला. कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहान मुलांसाठी अधिक घातक असेल असे बोलले जात आहे. आणि त्या अनुषंगाने लहान मुलांसाठी लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.

आता कोव्हक्सीन च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्याने लवकरच लहान मुलांसाठी देखील लस उपलब्ध होईल अशी चिन्हे आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here