द पॉईंट नाऊ ब्युरो : 18 वर्षांखालील मुलांना आता कोरोनासाठीची लस दिली जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने सिरम इन्स्टिट्यूट च्या कोव्होव्हॅक्स या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट चे अदर पुनावाला यांनी सांगितले आहे. अदर पुनावाला यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने जग हैराण झाले होते. त्यानंतर जगभरात अनेक प्रकारच्या कोरोनावरील लसी उपलब्ध झाल्या आणि लसीकरण सुरू झाले.
मात्र हे लसीकरण केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींसाठीच होते. आता 18 वर्षांखालील मुलांना देखील लसीकरणाला परवानगी मिळाल्याने कोव्होव्हॅक्स या लसीचा वापर केला जाणार आहे.
लहान मुलांसाठी अद्याप कुठेही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिल्यानंतर कोव्होव्हॅक्स ही लस लहान मुलांसाठी उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या पुढच्या लाटेचा लहान मुलांना फटका बसेल म्हणून सांगितले जात होते. त्यामुळे सर्व पालक वर्ग चिंतीत झाला होता. त्यात लहान मुलांसाठी लसच विकसित केली गेली नसल्याने अधिक चिंतेचे वातावरण होते. मात्र आता सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होव्हॅक्स लसीचा पर्याय उपलब्ध झाल्याने, चिंता काहीशी कमी झाली आहे.
मागील काही काळापासून लहान मुलांना कोरोना झाल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. आता कोव्होव्हॅक्स लस पालक वर्गाची चिंता काहीशी नक्कीच दूर करणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या जगभरात कोरोनाच्या ओमीक्रॉन या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. आणि हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
भारतात 127 कोटींहून अधिक लसीकरण झालेले आहे. आणि लसीकरण प्रगती पथावर आहे. आता लहान मुलांसाठी देखील लस उपलब्ध झाल्याने, लसीकरणाबाबत सरकारला योग्य त्या प्रकारचे नियोजन करावे लागणार आहे.
भारतात सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत दक्षता घेऊन सारे काही पार पडत आहे. आता या लहान मुलांच्या नवीन लसीचे नियोजन कसे केले जाते. याकडे लक्ष लागले आहे.
आता जागतिक आरोग्य संघटनेने
कोव्होव्हॅक्स लसीला परवानगी दिली आहे. मात्र ही लस लसिकरणासाठी कधी उपलब्ध होणार? लसीकरण कधी सुरू होणार? हे अजून निश्चित होणे बाकी आहे.
त्यामुळे जोपर्यंत याबाबत काही निर्णय होत नाही, तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम