गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाल्याचं दिसत आहे. बुधवारी सोनं 46,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढते आहे.
सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज (गुरुवारी) सोन्याचा दर 46,100 रुपये पर्यंत स्वस्त झाले आहे. तसेच चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली. काल चांदी 61,200 रुपये होती. आज चांदीची किंमत 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
या घसरणीनंतर सोने-चांदीची खरेदी अधिकच फायदेशीर झाली आहे. गेल्या महिनाभरापासून सध्या सोन्याचा दर 5900 रुपयांनी तर चांदी 1800 रुपयांनी स्वस्त होत आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात सोने-चांदी कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम