लग्न जुळवून मध्यस्थीने घातला १ लाख रुपयांचा गंडा

0
13

नाशिक येथील ब्राह्मणवाडे येथे मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघून देणारा एका मध्यस्थाने एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली. याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, नवरीही माहेरी निघून गेल्याने या कुटुंबावर संकट ओढावले.

ब्राह्मणवाडे येथील इंदूबाई छबू गिते 65 यांनी उपवर मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधण्याकरिता साहेबराव विठ्ठल गिते यांना 1 लाख रुपये दिले होते. त्यानुसार साहेबरावने इंदूबाई मुलाचे एका मुलीसोबत लग्न लावून दिले. नवरी सासरी नांदत असताना काही दिवसांनी साहेबराव गिते तिला घेऊन गेले.

इंदूबाई व कुटुंबीयांनी सुनेला सासरी येण्याची विनंती करूनही तिने नकार दिल्याने तक्रार दाखल केली. यावर इंदूबाई यांनी साहेबराव यांच्याकडे मुलगी बघून देण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी साफ नकार दिल्याने इंदूबाई गिते यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात साहेबराव गिते यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here