लग्नाच्या वाढदिवसी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन

0
40

कळवण प्रतिनिधी : सध्या कोरोना महामारीच्या काळात आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक जण जगण्यासाठी संघर्ष करत आहे. यासाठी खेडगाव ( गणेश) येथील प्रगतशील शेतकरी विनय कुलकर्णी व अंगणवाडी सेविका दिपाली कुलकर्णी या दांपत्याने आपल्या लग्नाच्या वर्धापनदिनी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करून एक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण भारतात कोरोणा महामारीने धुमाकूळ घातला आहे. शासनाने वेळोवेळी लॉक डाऊन घोषित केल्याने नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात जास्त प्रश्न हे बालकांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक वाढी बरोबरच प्रौढ लोकांच्या वजन वाढीचे निदर्शनात आले आहेत. मानवी जीवनात मेद वृद्धिमुळे हृदय रोग, मधुमेह अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण बळावले आहेत. यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना योग्य मार्गदर्शन होऊन त्यांचे आरोग्य सुरळीत व्हावे या उद्देशाने कळवण तालुक्यातील खेडगाव गणेश येथील प्रगतशील शेतकरी विनय कुलकर्णी यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी इतर खर्चाला मूठमाती देऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी विवाह वर्धापन दिनाचे औचित्य साधून लहान मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, वजन वाढीसाठी तसेच तरुण व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार, विहार व औषधोचार यासंदर्भात आरोग्य सल्लागार डॉ. अमोल झिने, डॉ. दीपक नरवडे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. गणेश बोंडे यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विनय व दिपाली कुलकर्णी या दांपत्याने केले आहे.

आपल्या जीवनात येणाऱ्या आनंददायी क्षणांमध्ये इतरांनाही भागीदार करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी आम्ही उभयतांनी सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून त्यांच्या आरोग्याच्या मूलभूत समस्यांविषयी मार्गदर्शन व्हावे यासाठी आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here