रोटरी मिडटाऊन मालेगावतर्फे गर्भाशय व स्तन कॅन्सर मोफत तपासणी

0
41

पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भगिनींसाठी गर्भाशय व स्तन कॅन्सर मोफत तपासणी शिबिरे २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मॅमोग्राफी व्हॅन समन्वयक उदय राहुडे, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी दिली. देवळा तालुक्यातील पाच गावात सकाळी दहा ते पाच ग्रामपंचायत कार्यालय जवळ ही तपासणी होणार आहे.

या तपासणीसाठी डॉ ऐश्वर्या गायगोले, उदय निंभोरकर, तंत्रज्ञ आरती जांभुळकर निलिमा वानखेडे आदीसह वैद्यकीय पथक काम पहात आहे.दैनंदिन जीवनात घराची आणि इतरांची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. गेल्या काही वर्षात महिलांमध्ये वाढलेले कॅन्सरचे प्रमाण बघता अशा प्रकारचे शिबिर हे महिलांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनची या तपासणीसाठी अत्याधुनिक व्हॅनच्या माध्यमातून महिलांची स्तनांची कॅन्सर व गर्भाशयाची कॅन्सर तपासणी करण्यात येते. रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या या उपक्रमात मालेगावसह कसमादे परिसरात मालेगाव शहर व कॅम्प भागात तीन ठिकाणी तर दाभाडी, तळवाडे, खाकुर्डी, अस्ताणे, साकोरे या गावात प्रत्येकी एक शिबिर घेण्यात आले दरदिवशी शंभर महिलांची मोफत तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणी माध्यमातून जनजागृती होऊन योग्य वेळी अचूक माहिती मिळणार असल्याने तपासणी शिबिरात चाळीस वर्षांवरील महिलांनी शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन रोटरी मिडटाऊनचे सचिव सुमित बच्छाव यांनी केले आहे.

२६ ऑक्टोबर- ग्रामपंचायत डोंगरगाव
प्रकल्प समन्वयक: विलास सोनजे, संदीप पवार
—————-
२७ ऑक्टोबर- ग्रामपंचायत दहिवड
प्रकल्प समन्वयक: सचिन शहा, केदारनाथ भागवत

२८ ऑक्टोबर- ग्रामपंचायत मेशी

प्रकल्प समन्वयक: निखिल दशपुते,प्रविण वाणी

२९ ऑक्टोबर – ग्रामपंचायत निंबोळा
प्रकल्प समन्वयक: केशव खैरनार, सतिश कलंत्री

३० ऑक्टोबर- ग्रामपंचायत उमराणे
प्रकल्प समन्वयक: राजेंद्र जाधव, राजेंद्र भामरे.

कसमादे परिसरात पंधरा दिवसांत साधारण १५०० महिलांची गर्भाशय व स्तन कॅन्सर तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. रोटरी मिडटाऊन अमरावतीचे व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने या सवलतीचा महिलांनी फायदा घ्यावा.
– उदय राहुडे.
मॅमोग्राफी व्हॅन समन्वयक, रोटरी मिडटाऊन.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी महागड्या तपासणी होत नसल्याने ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने महिला आरोग्य जनजागृतीसाठी हा प्रकल्प घेत आहोत.
– राजेंद्र दिघे.
प्रेसिडेंट: रोटरी मिडटाऊन मालेगाव.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here