रेल्वे प्रवास होणार आता अधिक सुसाट ! 3 वर्षात 400 ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार…

0
16

मुंबई : अर्थसंकल्प 2022 ची घोषणा आज १ फेब्रुवारी मंगळवारी करण्यात आली आहेत . केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या तीन वर्षांत 400 वंदे भारत एक्स्प्रेस धावणार याची घोषणा केली. या वंदे भारत एक्सप्रेस द्वारे आणखी शहरे जोडण्याची अधिक शक्यता आहे. यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार इंधनाचा खर्च कमी वाचणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. त्याशिवाय देशात मेट्रो जाळं विस्तारणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.

सोबतच 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल देखील पुढील 3 वर्षात विकसित करण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस शहरी वाहतूक रेल्वेशी जोडली जाईल आणि लहान शेतकऱ्यांसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत असे देखील म्हटले की, कोरोना महामारीच्या काळात अनेक भारतीयांना अनेक खडतर परिस्थितींचा सामना करावा लागला. आणि भारत हा देश जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या अर्थसंकल्पातून भारत पुढील 25 वर्षांचा पाया रचेल, असेही अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here