चांदवड प्रतिनिधी : तालुक्यातील राहुड येथील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, तसेच गीते सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुड गावातील शिवप्रेमी किसन भागुजी पवार हे होते.
याप्रसंगी तलाठी खळेकर तात्या, ग्रामसेवक चित्ते मॅडम, चांदवड पोलीस स्टेशनचे देवरे व मोरे दादा,आरोग्य सेविका उसवाड उपकेंद्राचे डाॅक्टर आशा वर्कर राहुड व गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक ज्ञानेशवर ठाकरे सर यांनी केले व अभार फौजी वाल्मीक पवार यांनी मानले.
यावेळी राहुड येथील दत्तनगर मिञ मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य व नेञ तपासणी शिबिर आयोजीत करण्यात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम